देश

पदवीपूर्व परीक्षेच्या गुणांवर ‘एमबीए’ला प्रवेश 

पीटीआय

नवी दिल्ली - कोरोनाच्या साथीमुळे अनेक प्रवेश परीक्षा झाल्या नसल्याने एमबीए आणि पदव्युत्तर व्यवस्थापन अभ्यासक्रमासाठी (पीजीडीएम) पदवीपूर्व परीक्षेच्या गुणांच्या आधारे प्रवेश देण्यास शैक्षणिक संस्थांना परवानगी देण्यात आल्याचे अखिल भारतीय तंत्रज्ञान परिषदेने (एआयसीटीई) सोमवारी सांगितले. 

पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेशाच्या नियमातील ही सवलत केवळ २०२० ते २१ या शैक्षणिक वर्षासाठी आहे. भविष्यातील शैक्षणिक वर्षांसाठी ती लागू नसेल, असेही ‘एआयसीटीई’ने स्पष्ट केले आहे. देशपातळीवरील ‘कॅट’, ‘सीमॅट’, ‘आत्मा’, ‘मॅट’, ‘जीमॅट’ आणि ‘एमबीए’ व ‘पीजीडीएम’साठी त्या-त्या राज्यांत सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) आयोजित केली जाते. यंदा कोरोनाव्हायरसच्या प्रभावामुळे अनेक राज्यात प्रवेश परीक्षा झालेल्या नाहीत. आगामी काळात त्या होणार की नाहीत याबाबत सध्या काही सांगता येत नाही, असे ‘एआयसीटीई’चे सदस्य सचिव राजीव कुमार म्हणाले. यामुळेच पदवीपूर्व परीक्षेच्या गुणांच्‍या आधारे गुणवत्ता यादी तयार करून त्या आधारे प्रवेश देण्याची परवानगी ‘एमबीए’ व ‘पीजीडीएम’च्या शिक्षण संस्थांना देण्यात आली आहे. ही गुणवत्ता यादी पारदर्शकपणे बनविण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

प्रवेश परीक्षा दिल्यास प्राधान्य 
जे विद्यार्थी एखादी प्रवेश परीक्षा देऊन त्यात पात्र ठरले आहेत त्यांना पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रथम प्राधान्य मिळणार आहे. या पदवी स्तरावरील किमान गुणांची अट ग्राह्य धरली जाणार नाही. जागा रिकाम्या असल्यास पदवीपूर्व परीक्षेतील पात्र विद्यार्थ्यांमधून निवड करावी, अशा सूचना शैक्षणिक संस्थांना केल्या आहेत, अशी माहिती राजीव कुमार यांनी दिली. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shiv Sena Symbol Dispute : दोन्ही गटांना नवे नाव, चिन्हे का दिली नाहीत? शिवसेना पक्षाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

India ODI Squad : भारताच्या वनडे संघात Rishabh Pant ला का मिळाली नाही संधी? ही असू शकतात ३ महत्त्वाची कारणं

Latest Marathi News Update : भाजपच्या माजी आमदारावर गुन्हा, मध्यरात्री तरूणीला फार्महाऊसवर बोलवून गैरकृत्य

Gokul Milk Union : गोकुळमधील अवसायनातील संस्थांना दिलासा, सर्वोच्च न्यायालयातील याचिका फेटाळली; ४९२ संस्थांचा मतदानाचा अधिकार कायम

‘देवमाणूस’नंतर किरण गायकवाडची नवी इनिंग; राजकारण अन् गुन्हा… ‘एफआयआर नं. ४६९’मध्ये नेमकं काय पाहायला मिळणार?

SCROLL FOR NEXT